Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मेट्रोचं तिकीट, ‘या’ नंबरवर करा मेसेज

मेट्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकत व्हॉट्सअ‍ॅपवर तिकीटाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मेट्रोचं तिकीट, ‘या’ नंबरवर करा मेसेज
SHARES

मेट्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकत व्हॉट्सअ‍ॅपवर तिकीटाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर तिकीटासाठी लाबंच लाबं रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.

आतापर्यंत मेट्रोन प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या मेट्रो प्रवास कार्डाला रिचार्ज करण्याची मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानंतर आता हा नवीन उपक्रम मेट्रोनं सुरू केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपनं मेट्रो तिकीट खरेदी करण्याची सेवा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमीटेडनं गुरुवारपासून सुरू केली आहे. MMOPL मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो सेवा चालवते.

मुंबई मेट्रो वन ही व्हॉट्सअ‍ॅपवर ई-तिकीट देणारी जगातील पहिली एमआरटीएस (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. MMOPL ने हे एक नवीन पाऊल उचलले असून, याआधीही बँक कॉम्बो कार्ड, मोबाइल QR तिकीट यांसारख्या अनेक सुविधा MMOPL ने दिल्या आहेत.

WhatsApp वर ई-तिकीट कसे बुक करावे?

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना 9670008889 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप 'Hi' असे संदेश पाठवावा लागणार आहे. यानंतर, त्यांना एक ओटीपी मिळेल, ज्याचा वापर करून ते ई-तिकीट घेऊ शकतात. कंपनीनं याचे वर्णन पेपर QR तिकिटाचा विस्तार म्हणून केला आहे. सध्या मुंबईतील प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

अलीकडेच दिल्ली मेट्रोने स्मार्ट कार्ड रिचार्जसाठी Amazon Pay सोबत हातमिळवणी केली आहे. आता पेटीएम व्यतिरिक्त, तुम्ही Amazon Pay द्वारे देखील तुमचे मेट्रो कार्ड रिचार्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे Amazon खाते असणे आवश्यक आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवावे लागतील. यानंतर, तुम्हाला Amazon Pay विभागात जाऊन बिल वर क्लिक करावे लागेल, जिथे मेट्रो रिचार्जचा पर्याय दिसेल. तुमचा मेट्रो स्मार्ट कार्ड क्रमांक येथे टाकून तुम्ही किमान रु. १०० पेक्षा जास्त रिचार्ज करू शकता.

याची रचना इन-हाऊस टीमनं केली आहे आणि आमचा तंत्रज्ञान भागीदार M/S Atek Payments Private Limited आणि वितरण भागीदार M/S Billeasy E Solutions Private Limited यांच्या संयुक्त विद्यमानं अंमलात आणली आहे, असं MMOPL च्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

खात्यांनुसार, या मेट्रो कॉरिडॉरमधून दररोज सुमारे २.६ लाख प्रवासी प्रवास करतात आणि अंदाजे १.२५ लाख तिकिटे विकली जातात.

दरम्यान, मेट्रो अधिकार्‍यांनी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या आणखी एका उपक्रमात, मुंबईकर मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 येथे सायकली भाड्यानं देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दहिसर-कांदिवली-गोरेगाव दरम्यान आपली सेवा सुरू केली आहे. ही सायकल सुविधा मेट्रो स्टेशनवर My Bike (MYBYK) अॅपद्वारे सुरू करण्यात आली आहे.



हेही वाचा

'लालपरी' पुन्हा पूर्वपदावर; निम्मे एसटी कर्मचारी कामावर हजर

Mumbai Local News: रेल्वे २०२३ पासून अपग्रेड केलेल्या २३८ एसी गाड्या खरेदी करेल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा