Advertisement

Mumbai Local News: रेल्वे २०२३ पासून अपग्रेड केलेल्या २३८ एसी गाड्या खरेदी करेल

या गाड्या टप्प्याटप्प्याने आणि मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत खरेदी केल्या जातील.

Mumbai Local News: रेल्वे २०२३ पासून अपग्रेड केलेल्या २३८ एसी गाड्या खरेदी करेल
(File Image)
SHARES

दिवसेंदिवस एसी लोकल गाड्यांमधील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. हे लक्षात घेता रेल्वेनं २०२३ पर्यंत प्रवाशांसाठी लोकोमोटिव्ह इंजिन असलेल्या सुधारीत एसी लोकल उपनगरियं ट्रॅकवर आणणार आहेत. यात अधिक जागा आणि सुधारित आसन व्यवस्था असेल.

असे समोर आले आहे की, या गाड्यांमध्ये मेट्रोसारखे आतील भाग असतील ज्यात सुधारीत आसन व्यवस्था असेल. तसंच प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी अतिरिक्त जागा असेल. त्यात स्वतंत्र सामानाच्या कप्प्यांचाही समावेश असेल.

एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यानं सांगितलं की, त्यांनी एसी लोकल ट्रेनसाठी आवश्यक डिझाईन आणि वैशिष्ट्ये अंतिम केली आहेत आणि निविदा जारी करण्याच्या अंतिम प्रक्रियेवर काम करत आहेत. या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस निविदा निघण्याची शक्यता आहे.

या गाड्या टप्प्याटप्प्यानं आणि मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत खरेदी केल्या जातील. २०२४ च्या अखेरीस एसी गाड्यांचा पहिला टप्पा शहरात येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमांतर्गत, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) ३A अंतर्गत २३८ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जातील.

सध्या, पश्चिम रेल्वेवर (WR) चर्चगेट आणि विरार रेल्वे स्थानकांदरम्यान आणि मध्य रेल्वेवर (CR) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)- कल्याण/कर्जत रेल्वे स्थानके आणि CSMT-पनवेल दरम्यानच्या मुख्य मार्गावर एसी लोकल धावत आहेत.



हेही वाचा

बेस्टच्या ताफ्यात लक्झरी बसेसचा समावेश, मर्सिडीज, व्होल्वोच्या नावांची चर्चा

रिंग रूट्सवर धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्यात येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा