आरपीएफने परत केली बॅग


SHARE

बोरिवली - मुंबईतील धावपळीच्या दैनंदिन जीवनात लोकलमध्ये बॅग विसरणे आता सामान्य बाब बनली आहे. मात्र अशा विसररलेल्या बॅग ताब्यात घेऊन संबंधितांना परत करण्यात आरपीएफ मोलाची भूमिका बजावत आहे. दिनेश गायकवाड हे प्रवासी लोकलमध्ये बॅग विसरून गेले होते. मात्र लोकलमध्ये बेवारस असल्याचा फोन आल्यावर आरपीएफने ही बॅग ताब्यात घेतली. नंतर दिनेश गायकवाड पोलीस ठाण्यात आल्यावर ओळख पटवून ही बॅग परत करण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या