कॉर्पोरेट ट्रीपसाठी बेस्टच्या एसी बसचा वापर

  Bandra
  कॉर्पोरेट ट्रीपसाठी बेस्टच्या एसी बसचा वापर
  मुंबई  -  

  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बसचा चेहरामोहरा बदलला. सफेद रंगाच्या बसवर पिवळे पट्टे असलेल्या दोन बसेस मुंबईच्या रस्त्यावर उतरवल्या आहेत. बीकेसी आणि सीएसटी या दोन मार्गावर या बस धावू लागल्या आहेत. मात्र वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्र स्थानक पूर्व या मार्गावर धावणारी वातानुकूलित बस फक्त कॉर्पोरेट ग्राहकांसाठीच चालवली जात असल्यामुळे सामान्य प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.

  बेस्टनं आपल्या ताफ्यातील सर्व वातानुकूलित बसगाडयांना 17 एप्रिलपासून कायमची विश्रांती दिली आहे. मात्र नवीन रंगसंगती असलेली एसी बस 'एएस ३१०' वांद्रे - कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक पूर्व या मार्गावर 27 एप्रिलपासून पुन्हा धावू लागली आहे. ही बस केवळ कॉर्पोरेट ट्रीपसाठी राखीव असून वन बीकेसी नावाच्या इमारतीतील कर्मचाऱ्यांसाठीच चालवली जाते. सदर बस भाडेतत्त्वावर बेस्टने दिली असून फक्त वन बीकेसी इमारतीच्या पासधारक प्रवाशांनाच त्या बसमधून प्रवास करता येतो. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी आणि 9 वाजून 40 मिनिटांनी तीन बसेस या मार्गावर धावतात. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी आणि 7 वाजून 40 मिनिटांनी या बसेस वांद्रे पूर्व स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल या मार्गावर धावत आहेत. दिवसभरात एकूण 6 वातानुकुलित बसेस सोडल्या जात आहेत. मात्र या बसेस खाजगी ट्रीपसाठी असल्याची कल्पना सामान्य प्रवाशांना नसल्यामुळे ते या बसमधून प्रवास करण्यास बसमध्ये चढतात तेव्हा त्यांना बसमधून उतरवले जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये या खाजगी ट्रीप बसमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.