Advertisement

सुट्टी, वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या; रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी

सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल प्रवास सुरु झाल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुट्टी, वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या; रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी
SHARES

सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल प्रवास सुरु झाल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, वेळ निश्चित केल्यानं खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहचता येत नाही. त्यामुळं वीकेंड आणि इतर सुट्टीच्या दिवशी सर्व सामान्य प्रवाशांना पूर्ण दिवस प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.

मुंबईच्या उपनगरी रेल्वेनं सर्व सामान्य प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आणि अन्य लोकल प्रवाशांना सोयीस्कर नाहीत. या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सामान्य जनतेला पूर्णवेळ लोकल प्रवास उपलब्ध करून द्यावा, अशी नवी मागणी रेल्वे प्रवासी महासंघानं राज्य सरकारकडं केली आहे.

लोकल प्रवास पूर्णवेळ उपलब्ध नसल्यामुळं कसारा, कर्जत, खोपोली, वसई, विरार, पनवेल भागातील प्रवाशांना गेल्या १० महिन्याहून अधिक काळ लोकलनं मुंबईला जाऊ शकले नाहीत. रुग्णालयातील उपचार, नातेवाईकांच्या भेटी अन्य काही महत्वाची कामं, खरेदी अशा गोष्टी करता आल्या नाहीत, असं महासंघाकडून सांगण्यात आले.

सर्वसामान्य प्रवाशांनी गर्दीच्या वेळी प्रवास करू नये, असे निर्देश राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारनं यासाठी वेळेचं नियोजन आखले आहे. मात्र, या नियोजनामुळं कार्यालयात वेळेत पोहचणं शक्य होत नाही. अनेक वेळा लेट मार्क लागणं, हाफ डे होणं अशा अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं शनिवारी, रविवारी आणि इतर सुट्यांच्या दिवशी पूर्ण दिवस लोकल प्रवास करण्याची मुभा दिल्यास कार्यालयात लवकर पोहचता येईल, छोट्या व्यापाऱ्यांना सामग्रीची खरेदी करता येणं शक्य होईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

सरकारी, निम सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शनिवारी, रविवारी सुट्टी असते. शनिवारी, रविवारी लोकलमध्ये गर्दीचं प्रमाण कमी असते. पीक अव्हरला देखील विरळ गर्दी असते. त्यामुळे यावेळी सर्व सामान्य प्रवाशांना परवानगी देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा