Advertisement

दोन्ही डोस घेतलेल्यांना ऑनलाईनही मिळतोय युनिव्हर्सल पास, ‘ही’ आहे प्रक्रिया

युनिव्हर्सल पास काढल्यावर त्याचा फायदा आणि तो कसा काढायचा हे जाणून घ्या...

दोन्ही डोस घेतलेल्यांना ऑनलाईनही मिळतोय युनिव्हर्सल पास, ‘ही’ आहे प्रक्रिया
SHARES

राज्य सरकारनं १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा मासिक पास काढून प्रवास काढण्याची मुभा दिली होती. आता राज्य सरकारनं संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना युनिव्हर्सल पास देण्यास सुरुवात केली.

युनिव्हर्स पास कसा काढाल?

 • सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org या संकेतस्थळावर जा.
 • त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करा.
 • त्यानंतर नागरिकांनी आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
 • लगेचच मोबाईलवर ओटीपी पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
 • हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
  त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
 • या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदारानं स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
 • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल.
 • लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये सेव्ह करून, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.

'हा' आहे फायदा

युनिव्हर्सल पासचा वापर करुन तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आणि विमानानं प्रवास करता येतो. तसंच हा पास दाखवून मॉलमध्येही प्रवेश मिळतो. जाणून घ्या कशाप्रकारे हा पास काढाल.


हेही वाचा

मध्य रेल्वेचं यात्री अॅप लाँच, प्रवाशांना होणार ‘हा’ फायदा

'त्या' मार्गावर होणार कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा