बॉटल रिसायकल मशीन धूळखात

चर्चगेट -  मोठा गाजावाजा करून भारतातील पहिली बॉटल रिसायकल मशीन रेल्वे प्रशासनाने चर्चगेट रेल्वे स्थानकात बसवण्य़ात आली. प्राथमिक तत्वावर चर्चगेट, मरिनलाईन्स, ग्रॅंट रोड, चर्नी रोड स्थानकांत या मशीन बसवण्यात आल्या. अशा 50 मशीन बसवण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. मात्र तिचा वापर होत नसून प्रवाशांना त्याची माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या उपक्रमांचा फज्जा कसा उडतो याचा हे आदर्श उदाहरण आहे. शासनाच्या योजना चांगल्या असतात, पण राबवणारे हात कार्यक्षम नसल्यामुळे काय होते याचा या मशीन ढळढळीत पुरावा आहे. 

Loading Comments