Advertisement

शॉर्टकटला म्हणतात चेंडू! आता काय म्हणावं रेल्वेच्या मराठीला?


शॉर्टकटला म्हणतात चेंडू! आता काय म्हणावं रेल्वेच्या मराठीला?
SHARES

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती करणारे स्टिकर्स चिकटवण्याचं काम हाती घेतलं. पण, त्या स्टिकर्समधून रेल्वे प्रशासनाचं मराठी भाषेबाबतचं अज्ञान उघड झालं आहे! शिवाय गुगल ट्रान्सलेटरमुळे रेल्वेचं मराठी मस्करीचा विषय बनलंय.


गुगल ट्रान्सलेटर जिंदाबाद आणि शॉर्टकटचा झाला चेंडू!

रेल्वे प्रशासनाकडून गर्दीत कुठलीच विपरीत घटना घडू नये, म्हणून स्टेशनवरील पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर मार्गदर्शन करणारे स्टिकर लावले आहेत. पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ स्टेशनच्या एका पुलाच्या पायरीवर 'कृपया लहान चेंडू घेऊ नका' असं एक अजब स्टिकर लावण्यात आलं आहे. या स्टिकरचा अर्थ काय? हा प्रश्न खरंतर या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना पडला आहे.



याचा अधिक शोध घेतला असता या वाक्याचं मूळ इंग्रजी वाक्य सापडलं. हे मूळ इंग्रजी वाक्य होतं Please do not take short cuts! आता ज्यानी कुणी हे इंग्रजीचं मराठी भाषांतर केलं, त्यानं नक्कीच त्यासाठी गुगल ट्रान्स्लेटरची मदत घेतली असणार. कारण गुगल ट्रान्स्लेटरमध्ये या वाक्याचा शब्दश: अर्थ होतो 'कृपया लहान चेंडू घेऊ नका'! आता काय म्हणावं रेल्वेच्या या हास्यास्पद चुकीला!


एल्फिन्स्टन ब्रिजवर स्टिकरच नाहीत!

एल्फिन्स्टन स्थानकांत ज्या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती, त्या पुलाच्या पायऱ्यांवर तर रेल्वेकडून हे स्टिकरच लावण्यात आलेले नाहीत.

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर तिथे नवीन पूल बांधण्याची जबाबदारी लष्कराकडे देण्यात आली. त्यानुसार सर्व स्थानकांत अशी दुर्घटना होऊ नये, म्हणून अशा पद्धतीचे स्टिकर लावण्याचं काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलं आहे. पण हेतू जरी चांगला असला, तरी गुगल ट्रान्सलेटरने रेल्वे प्रशासनाची चांगलीच गोची केली आहे. रेल्वेच्या या चुकीचं सोशल मीडियावर भलतंच हसं होत आहे. रेल्वे प्रशासन ही चूक लक्षात घेऊन लागलीच यावर योग्य ती पावलं उचलो हीच अपेक्षा!



हेही वाचा

एल्फिन्स्टन स्टेशनबाहेर आलं 'पोर्टेबल' तिकीट घर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा