Advertisement

एल्फिन्स्टन स्टेशनबाहेर आलं 'पोर्टेबल' तिकीट घर


एल्फिन्स्टन स्टेशनबाहेर आलं 'पोर्टेबल' तिकीट घर
SHARES

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील २ तिकीट खिडक्या पुलाच्या बांधकामासाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने पोर्टेबल तिकीट घर सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून हे पोर्टेबल तिकीटघर सुरू करण्यात आलं आहे.



पादचारी पुलाच्या बांधणीसाठी तोडणार तिकीट घर

पादचारी पुलाच्या बांधणीसाठी स्टेशनवरील तिकीट घर तोडून तिथे नवीन तिकीट घर बांधल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. याशिवाय स्टेशनवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टिनेही या तिकीटघराचा फायदा होणार आहे, असंही जैन म्हणाले.




हेही वाचा

एलफिन्स्टनवर 23 बळी, धारावीतही तेच होणार?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा