मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वेस्थानकाला नवी झळाळी मिळाली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले स्थानक सुशोभीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं हे काम पूर्ण केले असून, स्थानकाची देखभाल आता मध्य रेल्वे करणार आहे.
भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचे आणि पुनरोद्धाराचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. 'आय लव्ह मुंबई बजाज ट्रस्ट ग्रुप'च्या सहकार्यानं आणि हेरिटेज कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा आणि कैस कन्स्ट्रक्शन यांनी एकत्रितपणे हे काम केले. वर्षभर कामे वेगानं झाल्यानंतर कोरोना काळात या कामांचा वेग मंदावला. अखेर आता हे काम पूर्ण झाले आहे.
स्थानकातील छताची ठेवण पुरातन वास्तूप्रमाणे करण्यात आलेली आहे. दरवाजे, खिडक्या दुरुस्त करून अतिरिक्त बांधकामे हटवण्यात आली आहेत. पारंपरिक रंगसंगतीच्या आधारे रंगकाम करून विद्युत-टेलिफोन केबल तारा सुस्थितीत करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा