Advertisement

पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं ५ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली आहे. त्यासाठी विशेष भाडं आकारलं जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ
SHARES

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं (western railway) ५ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली आहे. त्यासाठी विशेष भाडं आकारलं जाणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय, यामध्ये मुंबई सेंट्रल-समस्तीपूर विशेष गाडीच्या आठ फेऱ्यांत वाढ होणार आहेत. ही गाडी १, ३, ५ आणि ७ जूनला चालविण्यात येईल, तर समस्तीपूर-मुंबई सेंट्रल विशेष गाडी ३, ५, ७ आणि ९ जूनला धावणार आहे.

मुंबई सेंट्रल भागलपूर विशेष गाडीच्या २ फेऱ्यांत वाढ केली आहे. ही गाडी ४ जून रोजी, तर भागलपूर-मुंबई सेंट्रल विशेष गाडी ७ जूनला चालविण्यात येणार आहे. उधना-दानापूर सुपरफास्ट विशेष गाडीच्या २ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. उधना-दानापूर विशेष गाडी ३१ मे रोजी, तर दानापूर-उधना विशेष गाडी २ जूनला चालविण्यात येणार आहे.

उधना-छपरा सुपरफास्ट विशेष गाडीच्या २ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. दानापूर-उधना विशेष गाडी ४ जून आणि छपरा-उधना विशेष गाडी ६ जूनला चालविण्यात येणार आहे. राजकोट-समस्तीपूर विशेष गाडीच्या २ फेऱ्या वाढल्या आहेत. राजकोट-समस्तीपूर ही गाडी २ जूनला, तर समस्तीपूर-राजकोट विशेष गाडी ५ जूनला चालविण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनामुळं (coronavirus) रेल्वे प्रवासावर निर्बंध आले असले तरी, या प्रवाशांची मागणी लक्षात घेता व कोरोनाच्या नियमांचं पालन करत पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. 



हेही वाचा -

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा