मुंबईकर म्हणतायत टोल का भरायचा?

मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल बंद होण्याची मागणी होत असतानाच, येत्या एप्रिल महिन्यापासून टोलवाढ करण्यात आली आहे. टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवास आता महागणार आहे. टोलवाढीचा फटका मालवाहतुकीसह प्रवाशांनाही बसणार आहे. या आधी कारचालकांना 195 रूपये मोजावे लागत होते, आता 230 रूपये एवढा टोल भरावा लागणार आहे. वास्तविक टोलवसुली पूर्ण झाली असताना आम्ही टोल का भरायचा? असं प्रवासी आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे.

Loading Comments