Advertisement

ट्रेनच्या प्रत्येक बोगीतलं एक शौचालय हटवणार


ट्रेनच्या प्रत्येक बोगीतलं एक शौचालय हटवणार
SHARES

पुढच्या काही दिवसांमध्ये ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल, तर जरा सांभाळून. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक डब्यातील एक शौचालय कमी करण्याचा निर्णय घेतला असून गर्दीच्या वेळेस तुम्हाला कदाचित गैरसोईचा सामना करावा लागू शकतो. या शौचालयाच्या जागेवर आता केटरींगचे सामान ठेवण्यात येणार आहे.


ट्रेनमधील गर्दीची तुलना करता बोगीतील शौचालयाची संख्या वाढवण्याची गरज असताना रेल्वेने शौचालय कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे प्रवासी संघटनेने रेल्वेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.


प्रत्येकी १ शौचालय काढणार

ट्रेनच्या प्रत्येक बोगीमध्ये आमनेसामने २ याप्रमाणे ४ शौचालयाची व्यवस्था असते. त्यातील एक शौचालय काढून त्याठिकाणी केटरींगचे सामान ठेेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.


खाद्यपदार्थ उघड्यावर

रेल्वे प्रवाशांना ठराविक अंतरावर खानपानाची सुविधा पुरवण्यात येते. त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक बोगीत खाद्यपदार्थ घेऊन यावे लागते. परंतु बोगीत खाद्यपदार्थांचे सामान, जेवणाच्या ताटा ठेवायला जागा नसल्याने हे सामान दरवाजाजवळ उघड्यावरच ठेवले जाते.


बोगींचे रिडिझाईन

स्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे घातक असल्याने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ४० हजार बोगींमधून प्रत्येकी एक शौचालय हटविण्यात येईल. या बोगींचे रिडिझाईन करण्यात येईल. या कामासाठी रेल्वे प्रशासन स्पेन आणि चीनच्या इंजिनीअर्सची मदत देखील घेणार आहे.

रेल्वे प्रशासनाने १३ जूनपासून मिशन रेट्रो फिटमेंट अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत जुने आयसीएफ डिझाईनचे डबे आधुनिक आणि सुरक्षित बनवले जात आहेत. यापूर्वी रेल्वेच्या रिझर्व्ह क्लासच्या बोगींमध्येच २ शौचालये असायची. त्यानंतर १९७० मध्ये तत्कालीन सुधार समितीच्या सल्ल्यानंतर प्रत्येक बोगीत प्रत्येकी ४ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली.


ट्रेनच्या डब्यात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यात अतिरिक्त प्रवाशांचीही भर पडते. अगोदरच बोगीत उपलब्ध शौचालय प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरे ठरत अाहेत. शौचालयाची संख्या वाढविण्याऐवजी ती कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे प्रवासी संघटना



हे देखील वाचा -

'परे'चे आरोग्य सेवेवर कोट्यवधी खर्च



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा