Advertisement

प्रगती एक्स्प्रेसमधील सामान गेलं चोरीला


प्रगती एक्स्प्रेसमधील सामान गेलं चोरीला
SHARES

मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये 'उत्कृष्ट रेक' प्रकल्पांतर्गत आधुनिक बदल करण्यात आले होते. तसंच आधुनिक बदल केलेली ही एक्स्प्रेस ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेतही दाखल झाली होती. परंतु सेवेत दाखल झाल्यानंतर १५ दिवसांतच या एक्स्प्रेसमधील ४३ हजार रुपयांचं सामान चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. 


'या' सामानांची चोरी

'उत्कृष्ट रेक' प्रकल्पांतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आधुनिक बदल करण्यात आलं होतं. मात्र, मागील १५ दिवसांत या एक्स्प्रेसच्या वॉशरूममधील स्टीलचे २८ नळ, ८ आरसे, मोबाईल चार्जिंगसाठी बसवण्यात आलेले ३ होल्डर, शौचालयातील फवाऱ्यांची नळी अडकवण्यासाठी लावण्यात आलेले स्टीलचे २५ होल्डर, स्टीलचे १६ डस्टबिन, ‘उत्कृष्ट एक्स्प्रेस’च्या लोगोचे चार स्टीकर चोरीला गेले असून वॉशरूममधील फरशांची मोडतोड करण्यात आली आहे.


एक्स्प्रेसमध्ये आधुनिक बदल

प्रगती एक्स्प्रेसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसवण्यात आले आहेत. हवा खेळती राहाण्यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या असून नवीन पंखेही बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात उजेड राहण्यासाठी एलईडी बसवण्यात आले आहेत. तसंच या एक्स्प्रेसमधील प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजवण्यात आला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा