Advertisement

मुंबईहून आग्रासाठी 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू

मुंबई ते आग्रा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मुंबईहून आग्रासाठी 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू
SHARES

मुंबई ते आग्रा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिगो एअरलाइन्स १३ डिसेंबरपासून मुंबई ते आग्रा दरम्यान उड्डाणे सुरू करणार आहेत. हे विमान दर आठवड्याला ३ दिवस उड्डाण करेल.

यापूर्वी २२ जुलै रोजी मुंबई-आग्रा विमानसेवा सुरू झाली होती. पण ती काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. तब्बल ३ महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा इंडिगो एअरलाइन्स विमानसेवा या मार्गावर सुरू करणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे खेरिया विमानतळाचे संचालक ए. अन्सारी यांनी न्यूज18ला सांगितलं की, मुंबई ते आग्रा हे विमान छत्रपती शिवाजी विमानतळावरून दुपारी १२:४५ वाजता उड्डाण भरले. हे विमान दुपारी २.५५ वाजता खेरिया विमानतळ आग्रा इथं पोहोचेल.

आग्रा इथं ३० मिनिटे थांबल्यानंतर दुपारी ३:२५ वाजता हे विमान मुंबईसाठी टेक ऑफ करेल, ही फ्लाइट मुंबईला ५:३५ वाजता पोहोचेल. हे विमान सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी आग्रा इथं येईल. अशाप्रकारे आता मुंबई ते आग्रा हा मार्ग २ तास १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

ताजमहाल पाहण्यासाठी मुंबईतील लोक मोठ्या संख्येनं आग्रामध्ये येतात. त्यांना ट्रेननं प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना ताजचे दर्शन घेणं सोपं होणार आहे.


हेही वाचा

मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान, वॉटर टॅक्सी 'या' महिन्यात सुरू

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर डिसेंबरमध्ये ७२ तासांचा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा