Advertisement

मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान, वॉटर टॅक्सी 'या' महिन्यात सुरू

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे.

मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान, वॉटर टॅक्सी 'या' महिन्यात सुरू
SHARES

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. येत्या १६ डिसेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दोन्हीकडे जेट्टी तयार करून ट्रायल रनही पार पडलं आहे.

सध्या मुंबईकरांना नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गाचा आणि रेल्वेचा वापर करावा लागतोय. पण त्यात रोजचे काही तास घालवावे लागत आहेत. म्हणून ही वॉटर सेवा वरदान ठरणार आहे.

येत्या १६ डिसेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दोन्हीकडे जेट्टी तयार करून ट्रायल रनही पार पडलं आहे. सध्या मुंबईकरांना नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गाचा आणि रेल्वेचा वापर करावा लागतोय. पण त्यात रोजचे काही तास घालवावे लागत आहेत.

या वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांचा आताचा तासांवरचा प्रवास मिनिटांवर येणार आहे. मुंबई ते नवी मुंबई ४० मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईतील डोमेस्टीक क्रूज टर्मिनल प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी सांगितलं आहे. या मार्गावर टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीची निवडही पूर्ण झाली आहे.

रोज नोकरी, कामधंद्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणी सुकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी सेवा १२ मार्गावर तर ४ मार्गावर रोपेक्स सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास आणखी वेगवान होणार आहे.

अंदाजे एकेरी भाडे सुमारे ३०० रुपये असण्याची शक्यता आहे, जे द्वितीय श्रेणीसाठी १५ रुपये आणि प्रथम श्रेणीच्या प्रवासासाठी १५० रुपये असलेल्या रेल्वे तिकिटापेक्षा खूपच जास्त आहे.

अधिकाऱ्यांनी मात्र प्रवाशांना आरामात प्रवास करता येणार असल्याचं सांगितलं. "तसंच, प्रवाशांनी खाजगी वाहनं किंवा कॅबमध्ये एवढे अंतर प्रवास केल्यास त्यांच्या तुलनेत किमती कमी आहेत," असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.हेही वाचा

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर डिसेंबरमध्ये ७२ तासांचा बंद

'या' स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवे दर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा