Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद
SHARES

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. 

मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल. तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसणार आहे.

कोरोनामुळे २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती. त्यानंतर २५ मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं लक्ष लागून आहे. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक ३० नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती. पण आता ३१ डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.हेही वाचा

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा