वाशी टोल नाक्यावर पुन्हा रांगा

 Mandala
वाशी टोल नाक्यावर पुन्हा रांगा

मानखुर्द - पाचशे आणि हजारांच्या नोटबंदीनंतर ८ नोव्हेंबरपासून देशात टोलमाफी करण्यात आली होती. 24 दिवस सर्वच टोल नाके बंद होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून टोल पुन्हा सुरू झाले आणि शनिवारी सकाळी वाशी टोल नाक्यावर पुन्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. टोल बंद असल्यामुळे काही दिवस वाहनचालकांचे पैसे आणि वेळही वाचत होता. मात्र पुन्हा टोल सुरू झाल्यानं वाहनचालक निराश झाले आहेत. त्यातच २ हजारांच्या नोटेचे सुट्टे मिळत नसल्यानं वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतायत. याचा परिणाम म्हणजे वाहतूक कोंडी, असं मत रोहन कुबल या वाहनचालकानं व्यक्त केलंय.

Loading Comments