Advertisement

मुंबई विमानतळावरील जेटचं आॅफिसही बंद

आर्थिक गाळात गेलेल्या जेटची सेवा ठप्प झाल्यापाठोपाठ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जेटचं आॅफिस आणि तिकीट काऊंटर देखील बंद करण्यात आलं आहे. यामुळे जेटचं तिकीट खरेदी केलेल्या विमान प्रवाशांना परतावा मिळणंही अशक्य होणार आहे.

मुंबई विमानतळावरील जेटचं आॅफिसही बंद
SHARES

आर्थिक गाळात गेलेल्या जेटची सेवा ठप्प झाल्यापाठोपाठ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जेटचं आॅफिस आणि तिकीट काऊंटर देखील बंद करण्यात आलं आहे. यामुळे जेटचं तिकीट खरेदी केलेल्या विमान प्रवाशांना परतावा मिळणंही अशक्य होणार आहे.

परतावा बंद

आर्थिक अडचणींमुळे १७ एप्रिलपासून जेट एअरवेजची संपूर्ण विमान सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे जेटचं तिकीट घेतलेल्या प्रवाशांच्या पुढील प्लानची वाट लागली. सुरूवातीला असंख्य अडथळे पार करून का होईना परंतु जेटच्या प्रवाशांना तिकीटाचा काही प्रमाणात परतावा मिळत होता. परंतु तोही आता मिळणं बंद झालं आहे. जेटने इतर विमानतळांवरील आॅफिस बंद केले असले, तरी आतापर्यंत दिल्ली आणि मुंबई विमानतळावरील आॅफिस सुरू होते. परंतु ते देखील बंद करण्यात आलं आहे. 

कर्मचारी संभ्रमात

दुसऱ्या बाजूला जेटची सेवा ठप्प झाल्याने जेटच्या २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जेटचं आर्थिक व्यवस्थापन करणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने कंपनीची भागीदारी खरेदी करण्यासाठी १० मे ची मुदत दिली होती. ही मुदत संपत असून भारतीय कामगार सेनेनेही १० मे पर्यंत कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भात तोडगा न निघाल्यास दोन्ही विमानतळ बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.  



हेही वाचा-

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा

मुंबई-जयपूर दरम्यान स्पाइसजेटची सेवा सुरू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा