Advertisement

रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, तर मध्य-हार्बरवर मेगाब्लॉग


रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, तर मध्य-हार्बरवर मेगाब्लॉग
SHARES

मुबंई - रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती आणि तांत्रिकी कामासाठी रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉग असल्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वेवरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत अप आणि डाउन स्लो मार्गावरील वाहतूक बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान जलद मार्गावरून चालण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे 

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे डाउन स्लो मार्गावरील लोकल मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकच्या कालावधीत डाउन स्लो मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत. या स्थानकातील प्रवाशांना दिवा, डोंबिवली, कल्याण स्थानकातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच या लोकल नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसटी ते चुन्नाभट्टी/ माहिम या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही लाइनवर रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 या वेळेत तर डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसटी ते अंधेरी, वांद्रेदरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा