Advertisement

पश्चिम रेल्वेवर रविवारी 'जम्बोब्लॉक', 'मरे' वर मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेवर रविवारी 'जम्बोब्लॉक', 'मरे' वर मेगाब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी म्हणजेच ३१ डिसेंबरला जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रूझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते १५.३५ या वेळेत जम्बोब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सांताक्रूझ आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालतील. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येतील. मध्य रेल्वेने मेन लाइन आणि हार्बर लाइनवर रविवारी रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.


इथे असेल मेगाब्लॉक

दिवा-कल्याण डाऊन फास्ट लाइनवर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमी फास्ट गाड्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. डाऊन फास्ट लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन स्लो लाईनवर चालवल्या जातील. सकाळी १൦ वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ൦६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट तसंच सेमी फास्ट लाईनच्या गाड्या आपल्या निर्धारित थांब्याशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला स्टेशनवर थांबतील.


हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ तसंच डाऊन लाइनवर सकाळी ११.३൦ ते दुपारी ४.३൦ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११ वाजून ६ मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ३൦ मिनिटांपर्यंत पनवेल-बेलापूरहून सीएसटीएमच्या दिशेने सुटणाऱ्या सर्व अप व डाऊन हार्बर लाइन गाड्या तसंच सकाळी १൦.൦३ ते दुपारी ४.२८ पर्यंत सीएसटीएमहून पनवेल ते बेलापुरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अप-हार्बर लाइन गाड्यांची सेवा बंद असणार आहे.


अंधेरी-पनवेल सेवा रद्द

ब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी सेवा रद्द करण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नेरूळ आणि वाशी येथे विशेष सेवा चालवली जाणार अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा