Advertisement

रविवारी रेल्वेच्या सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


रविवारी रेल्वेच्या सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
SHARES

मुंबई - रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या अभियांत्रिकी कामकाजानिमित्त उद्या रेल्वेच्या तिन्ही मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. पश्‍चिम मार्गावर जम्बो ब्लॉक असून मध्य रेल्वे वर मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

पश्‍चिम रेल्वे -

‘परे’ मार्गावर रविवारी अंधेरी ते वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक होणार आहे. ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल वाहतूक गोरेगाव ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. लोकल गाड्या रद्द होण्याची सूचना वेळोवेळी स्टेशन मास्तरांकडून कळवण्यात येतील..

मध्य रेल्वे -

‘मरे’ मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यत मेगाब्लॉकचे कामकाज सुरू राहणार आहे. कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक होणार असून अप जलद लोकलसेवा अप धीम्या मार्गावरुन चालविण्यात येतील. तसेच डाउन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत अप मार्गावरील रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकांपर्यतच चालविण्यात येणार असून तेथूनच डाउन दिशेला मार्गस्थ करण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे -

हार्बर मार्गावर कुर्ला- वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी4.10 वाजेपर्यत मेगाब्लॉकचे कामकाज सुरू राहणार आहे. कुर्ला - वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसंच हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीटांवर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मुख्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा