Advertisement

कल्याण-डोंबिवली लोकल बंद


कल्याण-डोंबिवली लोकल बंद
SHARES

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यात येणार आहे. या गर्डरच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली स्थानकादरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर मंगळवार व बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ९.४५ वाजेपासून ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत या कालावधीत ४०० मेट्रिक टन वजनाचे ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळं कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक साडेचार तास पूर्णपणे बंद राहणार आहे. तसंच, एकूण १६ मेल-एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

या मेल-एक्स्प्रेस रद्द

  • (११००९-११०१० ) सीएसएमटी-पुणे सिंहगड
  • (१२१२३-१२१२४) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन
  • (१२१०९-१२११०) सीएसएमटी-मनमाड पंचवटी
  • (२२१०१-२२१०२) सीएसएमटी-मनमाड राज्यराणी
  • (१२०७१-१२०७२) दादर-जालना जनशताब्दी
  • (११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी
  • (५११५३-५११५४) सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर
  • (११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री

या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे

  • (१६३३९) सीएसएमटी-नागरकोईल एक्स्प्रेस
  • (११०११) एलटीटी-नांदेड एक्स्पेस
  • (१७०३१) हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस

लोकलवर परिणाम

दर २० मिनिटांनी कल्याण-कर्जत/कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणं, दर १५ मिनिटांनी डोंबिवली/ठाणे-सीएसएमटी विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर, सीएसएमटी-दादर, कुर्ला, ठाणे फेऱ्या वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा