Advertisement

'या' कामासाठी कल्याण ते कर्जत लोकल रद्द

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकात नवीन पादचारी पुलावर ४ गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे.

'या' कामासाठी कल्याण ते कर्जत लोकल रद्द
SHARES

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकात नवीन पादचारी पुलावर ४ गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे. या कामानिमित्त १२ डिसेंबरच्या मध्यरात्री २.१० ते पहाटे ६.२० पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

या ब्लॉकमुळं पहाटे ५ आणि ५.२८ वाजताची ठाणे ते कर्जत लोकल, सीएसएमटी ते खोपोली पहाटे ४.२४ वाजता, सीएसएमटी ते कर्जत पहाटे ४.४८, कुर्ला ते बदलापूर पहाटे ५.२७ वाजता, सीएसएमटी ते अंबरनाथ पहाटे ५.४० वाजता आणि सीएसएमटी ते कुर्ला सकाळी ८.४१ आणि ९.१२ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.

कर्जतहून सीएसएमटीला सुटणारी पहाटे २.३५ वा. ४.५३, ६.३३ वा. आणि ७ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. शिवाय, अंबरनाथ ते सीएसएमटी पहाटे ४.११ वा. बदलापूर ते सीएसएमटी पहाटे ६.४६ वा. आणि कल्याण ते सीएसएमटी पहाटे ४.४१ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२०१५ आणि ०२०१६ सीएसएमटी ते पुणे ते सीएसएमटी गाडी रद्द केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा