Advertisement

नव्या पत्री पुलाच्या कामासाठी शनिवार, रविवार रात्री मेगाब्लॉक


नव्या पत्री पुलाच्या कामासाठी शनिवार, रविवार रात्री मेगाब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातील पत्री पुलाच्या कामासाठी ६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याआधी मेगाब्लॉक घेत मध्य रेल्वेनं गर्डर लॉचिंग केलं. त्यानंतर आता पुढील कामासाठी २ रात्र प्रत्येकी ३ तास असे एकूण ६ तासांचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेनं जाहीर केला आहे. २७, २८ नोव्हेंबर रोजी रात्री त्यानंतर २८, २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेपर्यंत म्हणजेच ३ तास ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉक

  • डोंबिवली आणि कल्याण स्थानकांदरम्यान मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 
  • ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची डाऊन उपनगरी गाडी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२५ वाजता कर्जत करीता सुटणार आहे.
  • ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची अप उपनगरी गाडी कल्याण येथून सीएसएमटी करिता जाणारी रात्री ११.५ वाजता जलद मार्गावर आणि रात्री ११.५२ वाजता धिम्या मार्गावर सुटणार आहे.  
  • २८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.५४ वाजता कल्याण येथून सीएसएमटी जाणारी जलद मार्गावरील शेवटची उपनगरी गाडी धावणार आहे.
  • ब्लॉक संपल्यावर पहिली डाऊन उपनगरी गाडी कुर्ला येथून पहाटे ४.५१ वाजता टिटवाळा करीता सुटणार आहे. 
  • ब्लॉक संपल्यावर पहिली अप उपनगरी गाडी कल्याण येथून अप धिम्या मार्गावर पहाटे ५.३ वाजता आणि अप जलद मार्गावर पहाटे ५.४ वाजता सीएसएमटी करिता सुटणार आहे.

मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल 

  • गाडी  क्रमांक ०१०२० अप भुवनेश्वर- सीएसएमटी विशेष. 
  • गाडी क्रमांक ०२७०२ अप हैदराबाद- सीएसएमटी विशेष.  
  • गाडी  क्रमांक ०११४० अप गदग- सीएसएमटी विशेष.  
  • कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या कर्जत आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

या मेल, एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावणार

  • गाडी क्रमांक ०१०६२ अप दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटीला पहाटे ३.४० वाजता पोहचणारी गाडी टिटवाळा थांबेल.
  • गाडी क्र ०२५४१ अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटीला पहाटे ४ वाजता पोहचणारी गाडीला खडवली येथे थांबवण्यात येणार.
  • गाडी ट्रेन क्रमांक ०१०१६ अप गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस; एल.टी.टी. येथे पहाटे ४.२० वाजता पोहचणाऱ्या ट्रेनला वाशिंद येथे थांबवण्यात येणार आहे.
  • गाडी क्रमांक ०२८१० अप हावडा - सीएसएमटी मुंबई विशेष,  सीएसएमटी स्थानकावर पहाटे ५.२० वाजता पोहचणाऱ्या ट्रेनला आटगाव येथे थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक ०११४२ अप किनवट - सीएसएमटी विशेष  सीएसएमटी येथे पहाटे ५.३५ वाजता पोहचणारी ट्रेन खर्डी स्थानकावर थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक ०७०१८ अप सिकंदराबाद - राजकोट विशेष,  कल्याण येथे पहाटे ४.४५ वाजता पोहचणारी ट्रेन अंबरनाथ येथे थांबवण्यात येईल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा