Advertisement

कोल्हापूर-मुंबई विमानाने करा स्वस्तात प्रवास


कोल्हापूर-मुंबई विमानाने करा स्वस्तात प्रवास
SHARES

मुंबईहून कोल्हापूर विमान प्रवास अत्यंत कमी दरात करायचं असेल तर आता तुमचं हे स्वप्न पुर्ण होणार आहे. होय केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतील कोल्हापूर-मुंबई विमान सेवेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या विमानाचे भाडे फक्त १,९४० रुपये असणार आहे. 

एअर डेक्‍कन कंपनीने सुरू केलेली ही विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार आहे. पण ही सेवा आठवड्यातून किमान ५ दिवस आणि वेळापत्रक बदलून मिळावा, असा आग्रह एअर डेक्कन कंपनीने धरल्याने ही सेवा उशिरा सुरू झाली.


प्रतिसाद चांगला

कंपनीने २२ एप्रिलपासून ही विमान सेवा सुरू करणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. त्यानुसार ८ आणि १५ एप्रिल रोजी विमानाती चाचणी घेतली. मात्र, विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने ५ दिवस आधीच म्हणजेच १७ एप्रिलला विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच फ्लाईटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

मंगळवारी मुंबईहून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी विमान कोल्हापूरसाठी टेक ऑफ करणार आहे. तर दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान विमान कोल्हापूर विमानतळावर लँड करेल. यानंतर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी विमान पुन्हा मुंबईकडे झेपावणार आहे.


विमानाचं भाडे

प्रवाशांना रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरापेक्षाही कमी दरात विमान सेवेचा लाभ घेता येणार आहे. या विमानाचे भाडे फक्त १,९४० रुपये असणार आहे. प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना त्यांना या कंपनीने खास ऑफर्सही दिले आहेत. यामुळे भाडे आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी होणार आहे. कंपनीच्या बेवसाईटवर तिकिटाचं बुकिंग करता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा