Advertisement

'या' उन्नत मार्गिकेचे ४० टक्के काम पूर्ण


'या' उन्नत मार्गिकेचे ४० टक्के काम पूर्ण
SHARES

मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर करण्यासाठी चुनाभट्टी ते टिळनगरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. पाचवी-सहावी मार्गिका कुर्ल्याहून सीएसटीपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण आहे. त्यामुळे चुनाभट्टी ते टिळकनगरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

या स्थानकादरम्यान येणारे हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केलं जाईल. कुर्ला स्थानकात २ अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळं त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. परिणामी, या स्थानकातील हार्बर मार्गावरील २ फलाट ८ मीटर वर उचलले जाणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल. या उड्डाणपुलावर हार्बर मार्गाचे २ उन्नत फलाट असतील. त्याशिवाय इथं एक टर्मिनल फलाटही उभारला जाणार आहे. या टर्मिनल फलाटावरून पनवेलच्या दिशेने कुर्ला लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील अनेक प्रवासी पनवेल-कुर्ला यादरम्यान प्रवास करतात. त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

कुर्ला ते टिळकनगरदरम्यान हार्बर मार्गावर उन्नत मार्गासाठी खांब उभारले जाणार आहेत. त्यासाठी यादरम्यान असलेली सध्याची हार्बर मार्गिका काहीशी वळवावी लागेल. त्यासाठी कट कनेक्शनचे काम करावे लागणार आहे. त्यानंतर खांबांसाठी जागा मिळताच त्यावर गर्डर टाकला जाईल.

उन्नत मार्गिका करताना ती टिळकनगर ते चुनाभट्टी अशी असेल. त्यात हार्बरवरील कु र्ला स्थानक उन्नत असणार आहे. हे काम करोनामुळेही थांबले होते. त्याला गती दिली जात आहे. पनवेलच्या दिशेनेही जाण्यासाठी सीएसएमटी तसेच वडाळा स्थानकातून गाडय़ा सुटतात. हा प्रकल्प होताच कुर्ला हार्बरवरूनही पनवेलसाठी गाड्या सुटतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा