Advertisement

लोकल पूर्ण क्षमतेने सुरू, मात्र तिकीटांचा त्रास कायम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला लोकल प्रवास पुन्हा सुरू झाला.

लोकल पूर्ण क्षमतेने सुरू, मात्र तिकीटांचा त्रास कायम
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला लोकल प्रवास पुन्हा सुरू झाला. लोकलमधील प्रवाशांची गर्दी वाढू लागली. यामुळं प्रवाशांना आता सुरक्षित व गर्दी नियंत्रणात यावी यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर १०० टक्के  लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. गुरुवार २८ ऑक्टोबरपासून १०० टक्के लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला.

वाढीव फेऱ्यांचा दिलासा मिळाला असला, तरी लोकल प्रवासासाठी पासची सक्ती असल्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तिकीट मिळत नसल्यानं आठवड्यातील एक-दोन दिवसाच्या प्रवासासाठी महिन्याचा पास घेणं परवडणारे नाही, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

अत्यावश्यक सेवा कर्मचारी, २ लसमात्रा घेतलेले प्रवासी आणि १८ वर्षांखालील प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. ही वाढ लक्षात घेता कोरोनाकाळात कमी असलेल्या फेऱ्या गुरुवारपासून पूर्ववत करण्याची सूचना राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डानं मंजुरी देताच मध्य व पश्चिाम रेल्वेने लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.

१०० टक्के  क्षमतेने लोकल सुरू झाल्या असल्या तरीही प्रवाशांना अद्यापही तिकीट देण्यात येत नसून, मासिक पास घेण्याचीच सक्ती केली जात आहे. तिकीट खिडक्यांसमोर अधिक रांगा लागू नये, तसंच लोकल गाड्यांनाही फारशी गर्दी होऊ नये अशी कारणं देऊन घेतलेल्या या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच २ लसमात्रा घेतलेले आणि १८ वर्षाखालील प्रवासीही आहेत. ज्या प्रवाशांच्या २ लसमात्रा झालेल्या नाहीत, त्यांच्याकडून विनातिकीट प्रवास किंवा बनावट ओळखपत्राच्या आधारे पास मिळवून प्रवास केला जात आहे. त्यामुळं कार्यालयीन वेळेत सकाळी व संध्याकाळी घर गाठताना लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे.

मध्य व पश्चिाम रेल्वेवर मासिक पास तिकीट खिडक्यांवर दिला जात आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर पास घेण्यासाठी रांगाही असतात. तिकीट सुविधाच नसल्यानं मोबाइल तिकीट सेवा, एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा