कुर्ला स्टेशनवर पेंटाग्राफला आग

  मुंबई  -  

  मुंबई - सीएसटीहून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या पेन्टाग्राफला कुर्ला स्टेशनवर अचानक आग लागली. पेंटाग्राफमधून अचानक धूर निघू लागल्याने लोकल तात्काळ थांबवण्यात आली आणि प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ झाला. घटनेची माहिती कुर्ला आरपीएफच्या जवानांना मिळाली असता लगेचच फायर सेफ्टी सिलिंडरने ही आग विझवण्यात आली.

  आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार कपड्याचा तुकडा पेन्टाग्राफमध्य अडकला होता आणि तो जळाल्यामुळे ही आग लागली. त्यामुळे हार्बरवरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पण, आग विझवल्यानंतर तात्काळ लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.