मुंबईची 'हाल'बर!

जीटीबी - हार्बर मार्गावरील वडळा-जीटीबी स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी मालगाडी रुळावरून घसरली. या मालगाडीचे चारही डबे क्षतीग्रस्त झाले. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तब्बल 12 तास उलटल्यानंतरही हे डबे पूर्णतः बाजूला काढण्यात रेल्वेला यश आलेले नाही. यासाठी 500 कर्मचारी काम करत आहेत. हे डबे बाजूला केल्यांनातर रुळ, स्लीपर आणि ओव्हरहेड वायरचे काम झाल्यावर पाहणी करूनच लोकल सेवा सुरू होईल. अशी माहिती हार्बर रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र आपलं काम आटोपून घरी जायला निघालेल्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे मार्गावरून कुर्ला किंवा ठाणेहून नवीमुंबई, पनवेल असा प्रवास करावा लागत आहे.

सोमवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी गुरू तेग बहाद्दूर नगर डाऊन मार्गावर मालगाडीचे शेवटचे चार डब्बे घसरले. त्यामुळे सीएसटी ते कुर्ल्यापर्यंतची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकलची संख्या प्रचंड प्रमाणात घटली. या घटनेनंतर प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते पनवेल मेन लाईनवरुन वाहतुक सुरू ठेवण्यात आली. प्रवाशांना मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय प्रवाशांसाठी वडाळा, कुर्ला डेपोतून बेस्टच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या.


Loading Comments