Advertisement

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास होणार आणखी सुखर


पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास होणार आणखी सुखर
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा लोकल प्रवास आता आणखी सुखर होणार आहे. शिवाय, याआधी मेल-एक्स्प्रेसमुळं होणारा त्रासही कमी होणार आहे. याच कारण म्हणजे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना आणखी एक मार्गिका मिळावी आणि लोकल प्रवासही सुकर व्हावा यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारली जात आहे. या मार्गातील अडथळे संपुष्टात आले असून त्याची विविध कामे पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

यात पुलांची कामे, संरक्षक भिंत उभारणी यासह अनेक कामे त्वरित हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून ही कामे थंडावली होती. आता त्याला गती दिली जात असून पुढील वर्षांपर्यंत ही मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली स्थानकादरम्यान ४ मार्गिका होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांबरोबरच मेल-एक्स्प्रेसही याच मार्गिकांवरुन जात होत्या. परिणामी लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. तर लोकल फेऱ्याही वाढवता येत नव्हत्या. अखेर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ९१८ कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतुद रेल्वेने केली असून यातील पाचव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्वरीत सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले. परंतु १० वर्षे होत आली तरीही सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले नाही.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. मार्गिकेतील अडथळे दूर झाले आहेत. या मार्गिकेतील वांद्रे ते बोरिवली स्थानकादरम्यानची विविध कामे हाती घेतली असून त्यासाठी निविदा काढली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा