Advertisement

बनावट ओळखपत्रावर रेल्वेनं प्रवास करण्यास मनाई

राज्य सरकारनं सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घातले. मात्र, या कडक निर्बंधांनंतरही शुक्रवारी अनेकांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला.

बनावट ओळखपत्रावर रेल्वेनं प्रवास करण्यास मनाई
SHARES

मध्य रेल्वेवर काही अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्राचा आधार घेत, तर काहीजण विनातिकीट प्रवास करत आहेत. या प्रवाशांवर तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्यानं त्यांनाच स्थानकात प्रवेश देण्यासाठी रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बहुतांश स्थानकांतील पूर्व व पश्चिमेकडील प्रत्येकी २ ते ३ प्रवेशद्वारेच सुरू ठेवण्यात आली. शिवाय, जनसाधारण तिकीट सेवा, मोबाइल तिकीट सेवा व एटीव्हीएम सेवा बंद करण्यात आली. जेणेकरून या सेवांमधून तिकीट मिळवून अन्य प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत.

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी नसल्याने काही मंडळींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. अशा प्रवाशांना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी पकडले. २५ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा