Advertisement

मध्य रेल्वेवरील 'हा' मार्ग लवकरच होणार सुरू


मध्य रेल्वेवरील 'हा' मार्ग लवकरच होणार सुरू
SHARES

मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांचा दैनंदिन लोकल प्रवास नव्या वर्षात अधिक सुखकर होणार आहे. ठाणे-दिवादरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्ग खुला करण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. हा मार्ग उपलब्ध झाल्यानंतर ८०-१०० लोकलफेऱ्या वाढवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवीन रेल्वे मार्गाला जुन्या रेल्वे रुळांची जोडणी देण्याची आणि यार्ड जोडणीची कामे सध्या बाकी आहेत. ठाणे आणि दिवा या दोन्ही ठिकाणी ही जोडणी द्यावी लागणार आहे. तांत्रिक काम अचूक पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी अनुभवी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची जादा कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

'एमआरव्हीसीकडून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. मात्र, लोकलफेऱ्या किती वाढणार, त्या साध्या असतील की वातानुकूलित याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. जानेवारीत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्याने लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. विनावातानुकूलित एका लोकलगाडीच्या साधारण १०-१२ फेऱ्या होतात. यामुळे एकाचवेळी फेऱ्या वाढवण्याऐवजी प्रवासी मागणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी वाढीव लोकल चालविण्यात येतील.

२००८मध्ये हा प्रकल्प कागदावर मंजूर झाला. अतिक्रमण, खारफुटी, परवानगी या अडथळ्यांची शर्यत पार करत या प्रकल्पाचे काम आता जानेवारी २०२२मध्ये पूर्ण होणार आहे. २००८ मध्ये प्रकल्पखर्च १३० कोटी होता. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत खर्चाने ५४० कोटीपर्यंत उड्डाण केले असल्याची माहिती एमआरव्हीसीने दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा