Advertisement

परप्रांतियांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शासनाकडून 325 विशेष रेल्वे गाड्या


परप्रांतियांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शासनाकडून 325 विशेष रेल्वे गाड्या
SHARES
राज्यात आतापर्यंत 325 रेल्वेतून परप्रांतीय आपापल्या गावी गेले असून बुधवारी आणखी 60 गाड्या राज्यातील विविध ठिकाणांहून सोडण्यात येणार आहेत. या 385 गाड्यांमधून राज्यातून पाच लाख परप्रातीयांना त्यांच्या गावी पाठवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. परप्रांतीयांना गावी   पाठवण्यासाठी विशेष समितीत 1421 मंत्रालयीन कर्मचारी सहभागी करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात 187 गाड्या, बिहारमध्ये 44 गाड्या, मध्यप्रदेशात 30 गाड्या, राजस्थानमध्ये 13 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. बुधवारी पश्चिम बंगालमध्येही एक गाडी सोडण्यात येणार आहे.  ज्यांचे नाव यादीमध्ये आहे व ज्यांना सरकारकडून दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले आहे. अशाच व्यक्तींना या गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. या सर्व परप्रातीयांच्या तिकीटाचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केले.

मुंबईत मोठ्याप्रमाणात परप्रातीय राहत आहेत. त्यांना परप्रांतात पाठवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती. पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. सहपोलिस आयुक्त विनय चौबे व उपसचिव राहुल कुलकर्णी यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्या मदतीसाठी 1421 मंत्रायीन कर्मचारी देण्यात आले आहेत. त्याबाबतचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने जारी केला आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून  40 वर्षांखालील कर्मचा-यांना या समितीत समाविष्ठ करण्यात आले आहे. ही समिती परराज्यात जाणा-या व्यक्तींचे नियोजन करणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करण्यात येणार आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा