Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

'या' व्यक्तीमुळे त्यादिवशी मयुर शेळकेचे वाचले प्राण

मयुर शेळकेसोबतच आणखी एका व्यक्तीचा या कौतुकात वाटा आहे.

'या' व्यक्तीमुळे त्यादिवशी मयुर शेळकेचे वाचले प्राण
SHARES

वांगणी रेल्वे स्थानकावर चिमुरड्याला वाचवणाऱ्या रेल्वे पॉईंट्समॅन मयुर शेळके (Mayur Shelke)चं सर्वांनीच कौतुक केलं, पण मयुर शेळकेसोबतच आणखी एका व्यक्तीचा या कौतुकात वाटा आहे. त्यांचं नाव आहे. एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड (Vinod Jangid). त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मयुर आणि त्या मुलाचे दोघांचे प्राण वाचले.

विनोद जांगिड हे १७ एप्रिल रोजी उद्यान एक्स्प्रेल पुण्याहून मुंबईकडे घेऊन येत होते. यावेळी वांगणी रेल्वे स्थानकात येत असताना असताना रेल्वे रुळावर एक लहान मुलगा पडलेला दिसला. तसंच एक तरुण (रेल्वेचा पॉईंट्समन मयुर शेळके) लहान मुलाच्या दिशेनं धावत येताना त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी इमर्जन्सी ब्रेक मारले.

इमर्जन्सी ब्रेकमुळे गाडीचा वेग ताशी १०५ किमीवरुन ताशी ८० किमीपर्यंत खाली आला आणि मयुरला तीन ते चार सेकंदांचा जास्तीचा कालावधी मिळाला. काही सेकंदातच जांगिड यांनी गाडी पूर्णपणे थांबवली. 

विनोद यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला म्हणून मयुरला अधिक वेळ मिळाला आणि मयुर स्वत:चे देखील प्राण वाचवू शकला. या घटनेनंतर मयुरचं सर्वत्र कौतुक झालं. पण या कौतुकात विनोद जांगिड यांचाही सिंहाचा वाटा आहे.

अंबरनाथमधील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत विनोद जांगिड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आपण इमर्जन्सी ब्रेक मारला, हे जरी खरं असलं तरीही मयुरनं दाखवलेलं धाडस हे आजच्या काळात केवळ अचाट करणारं आहे, असं म्हणत विनोद जांगिड यांनी मयुर शेळकेचं कौतुक केलं.

१७ एप्रिल रोजी सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरून भरधाव वेगानं एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांतानं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यानं अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले होते.हेही वाचा

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र

पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा