Advertisement

मुंबई-गोवा क्रूझ सफर ११ ऑक्टोबरपासून


मुंबई-गोवा क्रूझ सफर ११ ऑक्टोबरपासून
SHARES

आलिशान क्रूझमधून मुंबई ते गोवा सफर करण्याची वाट पाहात असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ११ ऑक्टोबर रोजी पहिली क्रूझ मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे. 

मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझ सेवा सुरू करण्यात आली आहे. खासगी क्रूझ कंपनीच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरू करत आहे. एक दिवस आड अशी सेवा असेल. त्यामुळे आठवडाभरात कधीही क्रूझने गोव्याची सफर करता येणार आहे.


'या' सुविधा उपलब्ध

'अांग्रिया' असं या क्रूझचं नाव आहे. अांग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. या क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असं बरंच काही अनुभवता येणार आहे. एका क्रूझमध्ये ३०० प्रवासी प्रवास करू शकतील. 


सर्व चाचण्या यशस्वी

जानेवारी २०१८ मध्येच ही सेवा सुरू करण्याचा पोर्ट ट्रस्टचा विचार होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळी ही सेवा सुरू करता आली नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा ही सेवा रखडली. आता पावसाळा संपणार असल्याने क्रूझ सेवा सुरू करण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्टने घेतला. यासाठी मुंबई-गोवा मार्गावर क्रूझच्या काही चाचण्याही घेण्यात आल्या. ज्या यशस्वीरित्या पार पडल्या. याशिवाय ही क्रूझ सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्यांची पूर्तताही झाली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा