Advertisement

'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५००० कर्मचारी तंबाखूमुक्त

बेस्टच्या वैद्यकीय विभागाने २००३ साली 'तंबाखूमुक्त बेस्ट’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमामुळे बेस्टच्या तब्बल ५००० कर्मचाऱ्यांची तंबाखू व्यसनातून मुक्तता झाली आहे.

'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५००० कर्मचारी तंबाखूमुक्त
SHARES

तंबाखूसारखा दिसणाऱ्या 'मॅजिक मिक्स' या पदार्थामुळे बेस्ट चालकांचं व्यसन सोडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. बेस्टच्या वैद्यकीय विभागाने २००३ साली 'तंबाखूमुक्त बेस्ट’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमामुळे बेस्टच्या तब्बल ५००० कर्मचाऱ्यांची तंबाखू व्यसनातून मुक्तता झाली आहे.


९० टक्के कर्मचाऱ्यांना व्यसन

बेस्टच्या बस चालकांना दिवसभर बस चालवावी लागते. बस चालवताना काही वेळा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला त्यांना सामोर जावं लागतं. अशावेळी चालक तंबाखूचं सेवन करतात. मात्र तंबाखू हानिकारक असल्यामुळे बेस्टच्या वैद्यकीय विभागाने 'तंबाखूमुक्त बेस्ट’ हा कार्यक्रम २०१३ साली हाती घेतला होता. या कार्यक्रमार्तंगत बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ९० टक्के कर्मचाऱ्यांना तंबाखूचे व्यसन जडलेले होते. त्यामुळं या कर्मचाऱ्यांची तंबाखू व्यसनातून मुक्तता व्हावी यासाठी, बेस्टच्या वैद्यकीय विभागाने तंबाखू सारखा दिसणारा ‘मॅजिक मिक्स’ नावाचा पदार्थ तयार केला.


दालचिनीचा परिणाम

'मॅजिक मिक्स' या पदार्थासाठी २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम दालचिनी आणि चार ते पाच लवंग यांचे मिश्रण करून पूड केली जाते. ही पूड तंबाखूप्रमाणेच थोडीशी जाडीभरडी असते. चुना म्हणून तांदळाच्या पावडरचा वापर केला जातो. मॅजिक मिक्स खाल्ल्यानंतर कर्मचाऱ्यांना तंबाखू खाल्ल्याप्रमाणे समाधान मिळते. तसंच, यामधील दालचिनी तंबाखूची नशा सोडल्यानंतर होणाऱ्या परिणामांपासून दूर ठेवते.



हेही वाचा -

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा