Advertisement

सर्वांसाठी लोकल ट्रेन तेव्हाच सुरू होणार!

सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल ट्रेन सेवा कधी सुरू होणार असे प्रश्न सातत्याने सरकारला विचारले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.

सर्वांसाठी लोकल ट्रेन तेव्हाच सुरू होणार!
SHARES

जगभरात कोरोनाची दुसरी लाट येऊ घातल्याने काही देशांना पुन्हा लाॅकडाऊन करावं लागत आहे. आपल्याकडेही दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातच सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल ट्रेन सेवा कधी सुरू होणार असे प्रश्न सातत्याने सरकारला विचारले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. (we are waiting for railway ministry permission to start mumbai local train for all commuters says maharashtra cm uddhav thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, सगळ्यांचा प्रश्न आहे की आमच्या साठी लोकल कधी सुरू होणार? त्यासंदर्भात केंद्रासोबत बोलणं सुरू आहे. त्यांच्याकडून जसजशी परवानगी येत आहेत, तशी आपण लोकल सुरू करतो आहोत. पियुष गोयल ही चांगलं सहकार्य करत आहेत. ते सुद्धा आपल्याला मदत करतील याची आम्हाला खात्री आहे.

हेही वाचा- धार्मिक स्थळं केव्हा उघडणार, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च सांगितलं

आता आपण जवळपास सगळ्याच गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे सुद्धा काही टक्के उपस्थिती ठेऊन उघडायला परवानगी दिलेली आहे. व्यायामशाळा, रेस्टॉरंट, ग्रंथालय, वाचनालये सुरू झालेली आहेत. मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे.

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नसेल, तर शिस्तीचं पालन आवश्यक आहे.

कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केलं आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडं यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकतं, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा