Advertisement

धार्मिक स्थळं केव्हा उघडणार, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च सांगितलं

विरोधकांच्या दबावाला झुगारून आतापर्यंत राज्यभरातील धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च मंदिरांसह इतर धार्मिक स्थळं केव्हा उघडणार याचा खुलासा केला आहे.

धार्मिक स्थळं केव्हा उघडणार, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च सांगितलं
SHARES

विरोधकांच्या दबावाला झुगारून आतापर्यंत राज्यभरातील धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च मंदिरांसह इतर धार्मिक स्थळं केव्हा उघडणार याचा खुलासा केला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, सगळे विचारताहेत मंदिरं कधी उघडणार? उघडणार आहोतच. पण, जरा हे दिवाळी आणि नंतरचे १५ दिवस जाऊद्या. ज्येष्ठांनी बाहेर पडू नये म्हणून आपण जपतोय. या सगळ्यांची काळजी घेऊनच हा निर्णय घेतलाय आपण. लवकरच त्यासाठीही नियमावली बनवू. चपला मंदिराबाहेर काढा पण मास्क कधीच काढू नका. दिवाळीनंतर मंदिरं, प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ. कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची, ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचं सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल. परंतु मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचं हित जपणारच, ही ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नसेल, तर शिस्तीचं पालन आवश्यक आहे. 

कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केलं आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडं यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकतं

समाजाला, एकमेकांना त्रास न देता जेवढे मर्यादित फटाके तुम्ही वाजवू शकता, ते वाजवा. मी अगदीच काही आणीबाणी नाही आणत आहे तुमच्यावर! फटाक्यांवर बंदीच घालतो असं न म्हणता, आपण एकमेकांच्या विश्वासावर हा सण आनंदाने साजरा करूयात, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं. 

(maharashtra cm uddhav thackeray talks about religious places opening)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा