Advertisement

मुंबई-नागपूर मार्गावर 50 ई-चार्जिंग स्‍टेशन


मुंबई-नागपूर मार्गावर 50 ई-चार्जिंग स्‍टेशन
SHARES

महाराष्‍ट्र स्‍टेट इलेक्‍ट्र‍िस‍िटी ड‍िस्‍ट्रिब्‍युशन कंपनी ल‍िम‍िटेड (एसएसईडीसीएल) ने एक महत्तवपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 820 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर मार्गावर 50 ई-चार्जिंग स्‍टेशन उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्टेशनच्या 35 किमी अंतरावर हे स्टेशन उभारलं जाईल.


कुठे उभारणार हे स्टेशन?

नाशिक, औरंगाबाद, जळगांव आणि अमरावती यांसारख्या 2 टियर शहरांमध्ये हे स्टेशन उभारले जातील. या प्रकल्पसाठी राज्यासह केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. एमएसईडीसीएलकडे 2020 पर्यंत राज्यातील अशा 500 स्थानकांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.

राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारसुद्धा ई-गाड्या वाढवण्यावर भर देत आहे. यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहे. मुंबई आणि नाशिक सारख्या हायस्‍पीड मार्गावर कमीत कमी 12 स्‍टेशन उभारण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा