Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी ५ महिन्यांसाठी बंद

मुंबई विमानतळा (CSIA)वरील मुख्य धावपट्टी दुरूस्तीच्या कामांसाठी नोव्हेंबर २०१९ पासून पुढील ५ महिने अंशत: बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी ५ महिन्यांसाठी बंद
SHARES

मुंबई विमानतळा (CSIA)वरील मुख्य धावपट्टी दुरूस्तीच्या कामांसाठी नोव्हेंबर २०१९ पासून पुढील ५ महिने अंशत: बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी विमानतळावरील पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. परिणामी विमानाच्या वेळापत्रकात गडबड होऊ शकते.  

किती तास बंद?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीवरून तासाला ४६ विमानांचं उड्डाण होतं. ही धावपट्टी १ नोव्हेंबर २०१९ ते २८ मार्च २०२० दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत बंद राहील. धावपट्टीच्या दुरूस्तीचं काम दर रविवारी तसंच २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी होणार नसल्याने या दिवशी धावपट्टी सुरू राहील, असं मुंबई विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केलं. 

दुरूस्तीसाठी विमानतळाची धावपट्टी बंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान पहिल्यांदा धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.  यामुळे विमानतिकीटांच्या दरांत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली होती.  

रेकाॅर्डब्रेक संचालन

सर्वसाधारण दिवसात मुंबई विमानतळाच्या एकमेव मुख्य धावपट्टीवरून ९४० विमानांचं उड्डाण होतं. मात्र १ नोव्हेंबरपासून पुढील ५ महिने पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येणार असल्याने या धावपट्टीवरून तासाला ३६ विमानांचं उड्डाण होईल. २०१८ मध्ये मुंबई विमानतळावर २४ तासांत रेकाॅर्डब्रेक १,००३ विमानांचं संचालन करण्यात आलं होत. या काळात मुंबई विमानतळावरून ४८.५ दशलक्ष प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर प्रवास केला होता. यातुलनेत इंदिरा गांधी विमानतळावरून २०१८ मध्ये १,३०० विमानांचं संचालन करण्यात आलं होतं. ज्याद्वारे ६५.७ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता. फरक एवढाच की  इंदिरा गांधी विमानतळावर ३ समांतर धावपट्टीवरून विमानांचं उड्डाण होतं.

प्रवाशांना फटका

हा प्रामुख्याने पर्यटनाचा काळ असल्याने या काळात विमानांचं वेळापत्रक बिघडणार असल्याने विमान कंपन्या आणि प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो. काही विमानं रद्द करण्यात येतील, तर काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहे.

साधारणत: वर्षभराआधीच सर्व विमानकंपन्यांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय दर महिन्याला होणाऱ्या बैठकीतही विमान कंपन्यांना सूचना देण्यात येतील.  हेही वाचा-

मुंबई विमानतळावरील एक रनवे बंद, २३०हून अधिक विमान सेवा रद्द

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशाराRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा