Advertisement

वाहन चालकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवे नियम; जाणून घ्या

केंद्र सरकारनं मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

वाहन चालकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवे नियम; जाणून घ्या
SHARES

वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाहन चालकांना गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट (PUC)यांसारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही. एकंदरीत गाडीची कागदपत्रं जवळ बाळगण्याची गरज नाही. केंद्र सरकारनं मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागानं यासंदर्भात माहिती दिली.

 मिळालेल्या माहितीनुसार, मोटर वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल आहेत. १ ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे.

यासाठी डिजिटल कागदपत्रांची आरटीओकडून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असणार आहे.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर

  • वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो.
  • हा केवळ मार्ग शोधण्यासाठी, नेव्हिगेशनसाठीच असावा. यावेळी वाहन चालवताना लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी. 
  • चालकांनी दिलेल्या नेव्हिगेशनसाठी मोबाईलचा वापर कसा करायचा याची नियमावलीही मंत्रालयाने दिली आहे.
  • मोबाईल फोन गाडीच्या डॅशबोर्डला लावणं बंधनकारक असणार आहे.
  • ड्रायव्हरचे लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
  • मोबाईल फोन हातात घेऊन नेव्हिगेशनसाठी वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

आयटी सेवांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीमुळे वाहतुकीचे नियम पाळण्यास मदत होईल आणि यामुळे वाहनचालकांना त्रास देण्याचे प्रकारही थांबतील असा विश्वास यावेळी मंत्रायलयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा