Advertisement

मारुति सुझुकी १ लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार, जाणून घ्या कारण

तुम्ही मारुति सुझुकी वापरकर्ते आहात? मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते.

मारुति सुझुकी १ लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार, जाणून घ्या कारण
SHARES

मारुति सुझुकी एक लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार आहे. मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडनं शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. मारुतिनं जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली आहे. या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.

ग्राहकांच्या हितासाठी, मारुति सुझुकीनं मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहनं पुर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे.  सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल ६ च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवणार आहे.

या सर्व मॉडेल्सट्या गाड्या ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या १ लाख ८१ हजार ७५४ युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय.  प्रभावित भाग बदलणे नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.

ज्या वाहनमालकांना त्याच्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे, त्यांनी कंपनीच्या www.marutisuzuki.com (for Ertiga and Vitara Brezza) तसंच www.nexaexperience.com (for Ciaz, XL6 and S-Cross) या वेबसाईटवर जाऊन ‘Imp Customer Info’ या भागाला भेट द्यावी. 

त्यांच्या कारमध्ये काही त्रुटी असतील ज्या तपासण्याची गरज असेल तर तिथे वाहनाचा १४ अंकी चेसिस क्रमांक टाकावा. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड आहे आणि वाहन इनवॉईस/रजिस्ट्रेशन कागदपत्रांमध्ये देखील नमूद आहे.

“त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुति सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून कळवण्यात येईल. वर नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं,” अशी विनंती कंपनीनं ग्राहकांना केली आहे.

मारुती सुझुकीनं १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हे दुसरे वाहन परत मागवले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, दिल्लीस्थित कंपनीनं वाहनाच्या हेडलॅम्पमधील समस्या सोडवण्यासाठी Eeco च्या ४० हजार ४५३ युनिट्स परत मागवल्या होत्या. परत मागवलेल्या युनिट्सची निर्मिती ४ नोव्हेंबर २०१९ आणि २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान करण्यात आली.



हेही वाचा

बेस्ट बसच्या वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांचा संताप

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा