Advertisement

बेस्ट बसच्या वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांचा संताप


बेस्ट बसच्या वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांचा संताप
SHARES

बेस्ट उपक्रमानं १ सप्टेंबरपासून बस मार्गामध्ये बदल केले. त्यात नवीन बस मार्गाची भर पडली. मात्र, २३ बस मार्ग बंद आणि ४५ मार्ग खंडित केल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. काही मार्गावरील थांब्यांवर बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं केलेल्या या बदलांबाबत प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कोरोनाकाळात बेस्टनं बसमार्गामध्ये अनेक बदल केले. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने बेस्ट उपक्रमाने बसमार्गाचा आढावा घेऊन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी व सूचनांनुसार बसमार्गामध्ये १ सप्टेंबरपासून बदल केले.

बदललेल्या वेळापत्रकात २३ मार्ग बंदच केल्यानं या मार्गावरून नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडावा लागत आहे किंवा दुसरा पर्यायी बसमार्ग निवडावा लागत आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना बस थांब्यावर बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे.

बंद करण्यात आलेले मार्ग

  • बस मार्ग क्रमांक ३० (मर्यादित): मुंबई सेन्ट्रल आगार ते विक्रोळी आगार
  • बस मार्ग क्रमांक ७६ : मंत्रालय ते प्रतीक्षानगर
  • बसमार्ग क्र. ४५८ (लिमिटेड) : मालाड आगार ते ठाणे मॅरेथॉन चौक
  • सी ८ : मंत्रालय ते शिवाजीनगर आगार
  • बस मार्ग क्र. ३०९ : कुर्ला स्थानक पश्चिम ते गोराई आगार यांसह अन्य महत्त्वाच्या बसमार्गाचा समावेश आहे. 

यापैकी अनेक मार्ग लांब पल्ल्याचे आहेत. याशिवाय ४५ बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत. यात बस मार्ग क्र मांक २ मर्यादित इलेक्ट्रिक हाऊस ते आगरकर चौक दरम्यान धावणारी बस कलानगरहून वांद्रे वसाहत बस स्थानकापर्यंत, तर ओशिवरा आगार ते हुतात्मा चौक दरम्यान ही बस जे. जे. रुग्णालयापर्यंत धावत आहे. सात क्र मांकाची विक्रोळी आगार ते बॅकबे आगार दरम्यान धावणारी बसही विक्रोळी ते जे.जे. रुग्णालयापर्यंतच आहे.

बस मार्ग क्रमांक ४० मर्यादित प्र. ठाकरे उद्यान शिवडी ते बोरिवली स्थानकापर्यंत असलेली बस दिंडोशीपर्यंत चालवली जात आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बेस्टची वारंवारता सुधारण्यासाठी काही मार्गामध्ये १ सप्टेंबरपासून बदल करण्यात आले आहेत. परंतु बदल केलेल्या मार्गामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असेल तर त्याची माहिती उपक्रमाला द्यावी, त्याचा फेरआढावा घेण्यात येईल. प्रवाशांना दर दहा ते पंधरा मिनिटांनी बस सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यापुढे बेस्टच्या ताफ्यात अधिकाधिक बस दाखल होणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा