Advertisement

मुंबई सेंट्रलमध्ये प्रवाशांना चक्क स्पा आणि मसाज; वाचा संपूर्ण बातमी

प्रवाशांसाठी मसाज तसेच स्पा, बूट पॉलिश, मोबाइल चार्जिग यांसह विविध सुविधा उपलब्ध असलेले आरामदायी असे प्रतीक्षालय मुंबई सेंट्रल टर्मिनसवर उभारण्यात येत आहे.

मुंबई सेंट्रलमध्ये प्रवाशांना चक्क स्पा आणि मसाज; वाचा संपूर्ण बातमी
SHARES

प्रवाशांसाठी मसाज तसेच स्पा, बूट पॉलिश, मोबाइल चार्जिग यांसह विविध सुविधा उपलब्ध असलेले आरामदायी असे प्रतीक्षालय मुंबई सेंट्रल टर्मिनसवर उभारण्यात येत असून प्रतीक्षालयात प्रथमच मसाज व स्पाची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत. प्रतीक्षालयात दोन तासांसाठी १० रुपये शुल्क असेल, असे पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे प्रतीक्षालय एका महिन्यात प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

विमानतळाच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या प्रतीक्षालयाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेनं दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)चा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटीप्रमाणेच याही रेल्वे स्थानकांवर सर्व सुविधायुक्त असे प्रतीक्षालय उभारण्याचा संकल्प रेल्वेने सोडला असून सहा महिन्यांनंतर ही प्रतीक्षालये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

यामध्येही बऱ्याच सुविधा असणार आहेत. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही आरामदायी प्रतीक्षालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रतीक्षालयाचे काम सुरू झाले आहे. प्रतीक्षालयाची क्षमता साधारण ८० ते १०० प्रवासी इतकी आहे. या वातानुकूलित प्रतीक्षालयात आरामदायी आसनव्यवस्था, वायफाय, वर्तमानपत्र, मॅगझिनची सुविधा देतानाच मसाज, स्पा, बूट पॉलिश, मोबाइल चार्जिगचीही व्यवस्था असेल. प्रतीक्षालय उभारणे व सुविधा देण्यासाठी ६२ लाखांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.

प्रतीक्षालयात पहिल्या २ तासांसाठी १० रुपये आकारणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तासांसाठी १० रुपये आकारले जाणार आहेत. मसाज व स्पासाठी प्रवाशांना एका तासासाठी १५० रुपये द्यावे लागणार आहेत. तर बूट पॉलिशसाठी २० रुपये आणि मोबाइल चार्जिगसाठी प्रत्येक तासाला १० रुपये आकारले जातील.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा