Advertisement

शेवटचा दिवसही घसरणीचाच, माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावरून घसरली

नवीन वर्षाच्या निमित्ताने शेकडो पर्यटकांनी माथेरान गाठल्याने मिनी ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, सतत मिनी ट्रेन रुळावरून घसरत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

शेवटचा दिवसही घसरणीचाच, माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावरून घसरली
SHARES

वर्षाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा माथेरानची मिनी ट्रेन रुळांवरुन घसरली आहे. सोमवारी संध्याकळच्या सुमारास शटिंग करताना मिनी ट्रेन रुळावरुन घसरली. सुदैवाने यांत कुणीही प्रवासी जखमी झालं नाही.


प्रवाशांमधून नाराजी

पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मध्य रेल्वेने मिनी ट्रेनला ८ डिसेंबरपासून वातानुकूलित डबा जोडला आहे. तर नवीन वर्षाच्या निमित्ताने शेकडो पर्यटकांनी माथेरान गाठल्याने मिनी ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, सतत मिनी ट्रेन रुळावरून घसरत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.


चारदा घसरली

२०१८ वर्षाच्या डिसेंबर महिन्यात मिनी ट्रेन चार वेळा रुळावरून घसरली आहे. २१ डिसेंबर रोजी जुमापट्टी स्थानकादरम्यान मिनी ट्रेनचा फर्स्ट क्लास डबा घसरला होता. २० डिसेंबर रोजी जुमापट्टी स्थानकादरम्यान मालडबा घसरला होता. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी नेरळ स्थानकाजवळ इंजिन घसरलं होतं आणि आता शटिंग करताना मिनी ट्रेन रुळावरुन घसरली.



हेही वाचा-

थर्टी फर्स्टला ड्रंक अँड ड्राइव्हची संख्या घटली, ७६ तळीरामांवर कारवाई

१० दिवसांत दुसऱ्यांदा घसरली माथेरानची मिनी ट्रेन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा