Advertisement

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर


माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर
SHARES

पर्यटनासाठी माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून विषेश सेवा पुरवण्यात येणार आहे. अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल आता ६ कोचऐवजी ८ कोचची होणार असून १ डिसेंबरपासून ही शटल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

काही दिवसांपूर्वी या माथेरान राणीला व्हिस्टाडोम (पारदर्शक) डबाही जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतल्याने माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे.


८ कोचची शटल सेवा सुरू

काही वर्षांपासून माथेरानची शटल सेवा सतत रुळावरून घसरण्याच्या दुर्घटना घडत होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेनं ८ कोचऐवजी ६ कोच चालवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता या मार्गावरील सर्व कामं पूर्ण झाली असल्यामुळे मध्य रेल्वेनं पुन्हा एकदा ८ कोचची शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शटल ट्रेनच्या ८ कोचमध्ये एक फर्स्ट क्लास, ५ सेकेंड क्लास सीटिंग आणि २ जनरल सेकंड क्लास अशा ८ कोचचा समावेश असणार आहे.


विशेष सेवा चालवणार

येत्या विकेंडला म्हणजे शनिवारी १ डिसेंबर आणि रविवारी २ डिसेंबर रोजी मध्य रेल्वंने विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ९ वाजता नेरळ स्थानकातून सुटणारी मिनी ट्रेन ११.५० वाजता माथेरान स्थानकात पोहोचेल. याशिवाय दुपारी २.२० वाजता माथेरान स्थानकातून सुटणारी मिनी ट्रेन संध्याकाळी ५ वाजता नेरळ स्थानकात पोहोचेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा