Advertisement

माथेरानच्या राणीची ट्रायल रन


माथेरानच्या राणीची ट्रायल रन
SHARES

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या माथेरानच्या राणीची सुरक्षा चाचणी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात या मार्गावर प्रत्यक्ष सेवा सुरू केली जाईल, अशी शक्यता आहे.


अशी घेतली सुरक्षा चाचणी

गुरुवारी सकाळी नेरळहून माथेरानदरम्यान रेल्वेच्या तंत्रज्ञांनी दिवसभर या मार्गावर माथेरानच्या राणीची सुरक्षा चाचणी घेतली. या सुरक्षा चाचणीमुळे अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा बंद ठेवण्यात आली होती. याचसोबत, शुक्रवारी सकाळी ८.५० वाजता माथेरान ते अमन लॉज चालणारी पहिली गाडीही रद्द करण्यात आली.


दुरुस्तीची कामं अंतिम टप्प्यात

दुरुस्तीची कामं अंतिम टप्प्यात असून सुरक्षा चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच नेरळ-माथेरान ही सेवा नियमित केली जाईल.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा