Advertisement

माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच एसी डबा


माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच एसी डबा
SHARES

हिवाळ्यात थंडीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण, माथेरानच्या मिनी ट्रेनला एसी डबा जोडण्यात येणार असून या डब्यातून प्रवाशांना लवकरच प्रवास करता येणार आहे. या एसी डब्याच्या प्रवासासाठी प्रत्येकी ५०० रु. तिकीट आकारण्याचा विचार सुरु असून तिकिटदरांना मान्यता मिळताच हा डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.


 डब्यांची रचना आकर्षक

मध्य रेल्वेनं उन्हाळ्यात उकाड्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसी डब्याचा पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे, हा एसी डबा तयार झाला असून लवकरच मिनी ट्रेनला जोडला जाणार आहे.

मध्य रेल्वेने या एसी डब्यात दीड टन क्षमतेचे एसी बसवले आहेत. त्यासाठी ७५० केव्ही जनरेटर जोडण्यात आला आहे. या डब्यात १६ आसनं असून या डब्यांची रचना आकर्षक ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा