Advertisement

पश्चिम रेल्वेवर माटुंगा रोड स्थानक झालं 'महिला' स्थानक!

८ मार्चपासून माटुंगा रोड स्थानकाचा सर्व कारभार महिला सांभाळणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेवरही संपूर्ण महिला स्टाफ असण्याचा मान आता माटुंगा रोड स्थानकाला मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेवर माटुंगा रोड स्थानक झालं 'महिला' स्थानक!
SHARES

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत पश्चिम रेल्वेवरील माटुंगा रोड स्थानक गुरुवारपासून महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे! ८ मार्चपासून माटुंगा रोड स्थानकाचा सर्व कारभार महिला सांभाळणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेवरही संपूर्ण महिला स्टाफ असण्याचा मान आता माटुंगा रोड स्थानकाला मिळाला आहे.



सर्व कर्मचारी असणार महिला

यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवर आणखी एका महिला विशेष स्थानकाची भर पडली आहे.
या स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. स्थानकात तिकीट तपासनीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



३१ महिला कर्मचारी सांभाळणार कार्यभार

या स्थानकात १ स्थानक व्यवस्थापक, ३ तिकीट तपासनीस, ५ ते ६ रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे १२ ते १३ कर्मचारी आणि २ ते ३ स्वच्छता कर्मचारी असे एकूण 25 कर्मचारी होते. पण, गुरुवारपासून या स्थानकावर ३१ महिला कर्मचारी काम पाहणार आहेत.

माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचा संपूर्ण चार्ज स्टेशन मास्तर संध्या वर्मा यांना देण्यात आला आहे.


ही मोठी जबाबदारी माझ्यावर पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. शिवाय, यातील अर्धा स्टाफ माझ्यासोबत आधीपासून आहे. त्यामुळे आम्ही एकजुटीने माटुंगा रेल्वे स्थानकाला आणखी चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

संध्या वर्मा, स्टेशन मास्तर, माटुंगा रोड



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा